कांदा प्रश्नावरून विरोधकांनी विधिमंडळात मंगळवारी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सरकारला धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी कापसाची टोपी, कांद्याच्या माळा घालून आंदोलन केले. कांदा प्रश्नावरून विरोधकांनी सरकारची चांगलीच कोंडी केली. 'कांद्याला भाव मिळालाच पाहिजे, कापसाला भाव मिळालाच पाहिजे, हरभऱ्याला भाव मिळालाच पाहिजे, दोन रुपयाचा चेक देणार्या सरकारचा निषेध असो', अशा घोषणा देत विरोधकांनी विधान भवनाचा परिसर दणाणून सोडला. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कांदा उत्पादकांच्या पाठीशी शासन ठामपणे उभे आहे, असं सांगत विरोधकांना खडसावलं.
#EknathShinde #MaharashtraBudget #BudgetSession #Maharashtra #ShivSena #Budget2023 #UddhavThackeray #HWNews